माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल
Tuesday, 1 September 2020
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल - किशोर वय
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल - कॅसेट युगाची हवा
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल
भाग ३ - कॅसेट युगाची हवा
Thursday, 27 August 2020
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल - टेप रेकॉर्डरचे राज्य
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल
Wednesday, 26 August 2020
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल - दर्द-ए-डिस्को
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल
Tuesday, 25 August 2020
एक प्रार्थना
पुलंची एक प्रार्थना बऱ्याच जणांना माहीत असेल, तशीच माझी एक प्रार्थना आहे.
क्रायसिस
हल्ली एक नवा "क्रायसिस" निर्माण झाला आहे - माझे "वाचन".
स्वतःपुरता मर्यादित असल्याने हा फार गहन किंवा गंभीर विषय नाही. मला एकाग्रपणे वगैरे वाचता येतच नाही. वाचता वाचता सतत कसले तरी विचार चालू असतात. साधं उदाहरण, मित्राने लिहिलेले पुस्तक वाचायला घेतले, पण पुढे लवकर सरकता येत नाही. वाचतांना, ह्या लेखात विशेष काय आहे? मित्राला अभिप्राय लिहिताना काय-काय टिपता येईल, हे सर्व उद्योग चालू होते.
एव्हाना मला कुठलेही पुस्तक वाचतांना भराभर पुढे जात येत नाही. कदाचित "ग्रहण-शक्ती" कमी पडत असावी. काही जुन्या गोष्टी आठवतात, काही ठिकाणी "उत्सुकता" उफाळून बाहेर येते, मग गूगल करा, विकीपेडिया, एका लिंकवरून दुसऱ्या. डोक्यातल्या सगळ्या लिंक जागेवर परत आल्या की, "कुठे होतो मी?" असं म्हणून पुन्हा पुस्तकात जाण्याचा प्रयत्न! एकूणच, कोणीतरी माझी परीक्षा घेणार आहे, असा काहीसा समज करून मी वाचत असतो.
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल भाग १
माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल
Thursday, 19 March 2020
सांस्कृतिक बदलाची नांदी
सांस्कृतिक बदलाची नांदी
सध्या सर्व जगात कोरोना मुळे घरी आणि दारी एक "नजर कैद" निर्माण झाली आहे . "जग हे बंदिशाला" ह्याचा खरा अनुभव आता येतोय.
पाश्चिमात्य देशात "खाजगीपणा" किंवा एकमेकांना "स्पेस" देणे वगैरे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांच्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. पण आपल्या भारतासारख्या देशाला जिथे "साधन" पासून ते "साधना" पर्यंत पदोपदी माणूस समाजात मानसिकरीत्या गुंतला आहे, तिथे अलिप्त राहणे हि एक शिक्षा आहे.
आता मात्र जेव्हा हे बंधन क्रमप्राप्त आहे, तेव्हा हा "खेळ" किती दिवस चालेल ह्यावर बरेच काही अवलंबून आहे. एक-दोन आठवड्यात जर परिस्थिती पूर्ववत झाली तर शेअर मार्केटच्या ग्राफ प्रमाणे एक मोठा "खोल" स्पाईक आपल्या आयुष्यात दिसेल. परंतु, हे जास्त दिवस चालले तर कदाचित आपल्या सवयी बदलतील, आवडी-निवडी, परस्परांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असे बरंच काही बदलेल. आत्ताच आपण एकमेकांकडे संशयाने बघत आहोत.
आपल्या कडे लहान मुलांना कारमध्ये "कार-सिट" शिवाय जाणे, पुढील सीटवर बसणे ई. अगदी सामान्य आहे. मात्र काही देशात उदा. अमेरिकेत "कार-सिट" अनिवार्य आहे, नाहीतर दंड भरावा लागतो. ह्या प्रमाणे सध्या आपण जे "बिनधास्त" आयुष्य जगतो त्याला मर्यादा येतील, किंबहुना आपण स्वतःहून त्या मर्यादा घालू.
हे सगळे खरेअसले तरी "गरज" माणसाला सगळं काही शिकवत असते. पुन्हा काही दिवसांनी आपण आपण पूर्वपदावर येऊ. पण, मधल्या काळातील ह्या "बंदिशाळे" मुळे, कुठेतरी सांस्कृतिक (cultural) बदलाला सुरुवात झाली असेल.
संजय सोनार
१९-मार्च-२०२०