Friday 10 January 2014

सुर्याची पिल्ले


मित्रांनो 

(काल वसंत कानेटकरांचे "सुर्याची पिल्ले" पाहिले आणि हा विषय पुन्हा उफाळून आला. )

आपण सगळे भारतीय समाजातील जातीवाद आणि त्याची पाळेमुळे बघत आलो आहोत. आपल्यातील बहुतांश लोक जातीवाद नष्ट व्हावा असे मानणारे आहेत.

साधारणतः पन्नास एक वर्षांपुर्वी पर्यंत वाण्याचा मुलगा वाणी, शिंप्याचा मुलगा शिंपी, सोनाराचा मुलगा सोनार काम करीत असत. तंत्रज्ञान, शिक्षण आणि अधिक सोयीचे जीवन ह्यामुळे पुढची पिढी वेगवेगळ्या उद्योगाला लागली. सुरुवातीला कामगार, शिक्षक, सरकारी नोकरी,  Engineers, Doctors, Bankers ते आता IT पर्यंत वेगवेगळे व्यवसाय आलेत.

 

असं वाटतंच होते की आता जाती-पाती नष्ट होतील. परंतु गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता,  जुन्या जाती नष्ट होऊन (किंबहुना फक्त कागदावर राहून) एक नवीन जातीवाद निर्माण झाला आहे.

 

आता MBBS Doctors ची मुलं MD Doctor होतायेत, पोलिसाची पोलिस (IPS ), आमदाराची मुले मंत्री, Fight Master ची मुलं Directors तर IAS ची मुलगी IFS होतेय (अगदी MBBS झाली असली तरी).

थोडक्यात पिढीतला एक कर्ता हिमतीने पुढे आला की पुढच्या दहा पिढ्यांची सोय लावायला मोकळा. मग एखादा चांगला फोटोग्राफर असला तरी त्याला "कार्याध्यक्ष" करायचा. गम्मत म्हणजे अगदी दगड लोक सुद्धा ह्या ढकलगाडी मध्ये हळू-हळू गुळगुळीत होतात आणि "धूम" माजवतात. 

क्षमता/आवड असो वा नसो, सरकारी नाहीतर खाजगी संस्थेत "टाकून" द्यायचा. होईल रडत-पडत पास. - हि प्रवृत्ती सगळीकडे दिसते आहे.


तुमचे काय मत आहे? Comments करा.

संजय सोनार