Tuesday 3 April 2012

‘शाळा’ च्या निमित्ताने..

नोव्हेंबर २०११ मध्ये माझ्या शाळेत (श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, नंदुरबार) आमच्या बॅचच्या (१९८८) सर्व मुलांनी एक स्नेहसंमेलन आणि शिक्षकांचा सत्कार असा सोहळा आयोजित केला. शिक्षकांना आणि मित्रांना बर्याच दिवसांनी भेटून खूप छान वाटले होतेआमच्याच एका मित्राच्या सल्ल्याने सर्व मित्रांना momento म्हणून मिलिंद बोकील लिखित "शाळा" हि कादंबरी देण्यात आली.
आज उद्या म्हणता मार्च २०१२ मध्ये सर्व कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि भराभर संपवली सुद्धा. माझे वाचन तसं दिव्यंच आहेत्यामुळे संपूर्ण श्रेय पुस्तकाचे आहे कि मला ते संपवता आले.

'शाळा' वाचताना प्रत्येकाला जशी आपली शाळा आठवते तसेच मला झाले. कान्हेगाव म्हणजे दुसरे नंदुरबारच. सुदैवाने (कि दुर्दैवाने?) आमची शाळा फक्त मुलांची होती. त्यामुळे आम्हाला 'तसला' काही अनुभव आला नाही. नाही म्हणायला शेजारी डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल होते. काही ठराविक मंडळी आणि ११-१२ वी ज्यांनी शाळेत केले त्यांना मात्र 'शाळा' मधला 'जोशी' आपलासा वाटत असणार.
त्या पुस्तकातला 'क्लास' होता अगदी तसा शिंपी सरांचा किव्वा वाणी सरांचा क्लास होतामिसाळ सारखा आमचा दिनेश पाठक आमच्या कुलकर्णी सरांच्या घरा जवळ राहायचा. तमाम महाराष्ट्रात ड्रॉइंगचे सर साधे सरळ आणि आवडते असावेच लागतात, आमच्या ठाकरे आणि भोई सरांसारखे. PT चे सर शिस्तप्रिय आणि गोष्टी सांगणारे, जसे आमचे मराठे सर.
नगर वाचनालय सारखे एक वाचनालय होते नंदुरबारला वर्धमान मेडिकल जवळ. तसेच कान्हेगावातल्या मंदिरासारखे किंबहुना त्याहून 'सरस' नंदुरबारचे द्वारकाधीश मंदिर आहे.

चित्र्या सारखा आमचा नर्से इंजिनिअर साहेबांचा मुलगा.. घासू 'गोखले' सारखे कोणी नव्हते.. आमचा मकरंद हुशार असला तरी घासू नव्हता. अवली मुलांमध्ये काकडे, चिंगु, बोराळे, पानपाटील होते. पान्या शाळेत जरा आगाउ होता हे तो देखील आता मान्य करतो. NCC मुळे त्याला जरा जोर यायचा. आणि शिवाय क्रिकेट टीम चा हो अम्पायर. एकदा त्याला अत्तरदे सरांनी जाम बडवला होता.
अजून limelight मध्ये असणारी मुल म्हणजे, निकम, गुजराथी, लाडकरशहासोनारसाबळे आणि गिरनार (सरांची मुलं म्हणून), प्रशांत (सटाणा), बेहेरे, जाधव, साळुंके, साठे, परदेशी (सर्व), चित्ते..

फार कुणाच्या लक्षात येण्या सारखे आम्ही.. मी, भैय्या (सोनवणे), कासार, वाणी, जितु, अरविंद पटेल, नितीन पाटील, हसमुख, ठाकरे..
आणि harmless अशी.. भालचंद्र जोशी, विसपुते, बडगुजर, कवीश्वर, पाठक, तांबोळी, बोरसे, भावसार, मंडलिक,
शिवाय, '' मधली नसतांना आमच्या सोबत असणारे आमचे खास मित्र.. VC पटेल, विजय पटेल, लखलानी, SR पाटील, चौधरी (सर्व), देवेंद्र जैन..

'शाळा' मधला जोशी ज्या ठिकाणी राहत असतो, अगदी तश्याच वातावरणात आम्ही राहत होतो.. राउबाई चौधरी यांची दोन माजली इमारत, त्यात सहा घरे. मी तिथे पहिली ते नववी पर्यंत असताना राहत होतो. आणि दहावीला परदेशीपुरा.

मी आवर्जून 'शाळा' सिनेमा पुस्तक  वाचून झाल्यावर पाहिला.. लिखाणात जी मजा असते ती १००% सिनेमात आणताच येत नाही.. एखादी घटना घडताना मनातले विचार जे पुस्तकात मांडले गेले ते सिनेमात नाहीत.. जर तुम्ही 'शाळासिनेमा पहिला असेल आणि कादंबरी वाचली नसेल तर अवश्य वाचा!

संजय सोनार
3 April 2012