Thursday, 18 August 2011

सागरा प्राण तळमळला...

येत्या ऑक्टोबर मध्ये मला अमेरिकेतून परत यायला  वर्ष पूर्ण होतील.. 
१५ ऑगस्ट निमित्त मला सांगावेसे वाटते कि मला तिथे कायम स्थायिक होता आले असताना मी परत का आलो ते.
बरेच भारतीय परत येतात ते नाईलाजाने.. आणि जे थोडे फार स्वेच्छेने येतात, ते ४ शिव्या अमेरिकेला, तिथल्या संस्कृती ला देतात.. आणि भारताचे गुणगान करतात. (अर्थात त्यात वाईट काहीच नाही)

मला असे वाटते कि, अमेरिका वाईट नाही. तिथले शिक्षण सुद्धा वाईट नाही.. हवा पाणी, राहणीमान, सुरक्षितता, शांतता, सर्व बाबतीत भारताच्या मानाने अमेरिका सरस आहे, ह्या बद्दल वाद नाही. संस्कुती म्हणाल तर, भारतात शहरांची संस्कुती सुद्धा कालानुरूप बदलत चालली आहे. अगदी भारतीय खेडे गाव सुद्धा बदलले आहे.

मध्यंतरी कोणीतरी मला विचारले कि अमेरिकन संकृती चांगली कि आपली? मुळात दोन्ही देशांना संकृती आहे, हेच किती चांगले आहे. दोन्ही देशांची संकृती भिन्न आहे, पण वाईट कुठलीच नाही. पायी चालणाऱ्या लोकांना आधी प्राधान्य द्यायचे, उगाच होर्न वाजवून त्रास द्यायचा नाही, रांगेची शिस्तअश्या किती तरी गोष्टी आहेत कि ज्या मुळे अमेरिकेचा हेवा वाटतो. तर दुसरीकडे वडील धार्या लोकांचा मान, मुलांसाठी वैयक्तिक गोष्टींचा त्याग, पाहुणचार, विविधता, अश्या अनेक गोष्टी फक्त भारतात आहेत.
थोडक्यात काय, दोन्ही कडे चांगल्या वाईट गोष्टी आहेत.

मग अमेरिका इतकी छान असताना under  developed भारतात परत येण्याचे कारण काय?

कारण असे कि.. मी भारतीय आहे.. कारण असे कि अमेरिका छान आहे, पण तो माझा देश नाही. माझा देश जगात भारी आहे असा माझा दावा नाही.. पण तो माझा आहे. आणि जगासमोर अभिमानाने जावे असाच माझ्या देशाचा इतिहास आहे. लाज वाटावी अश्या काही गोष्टी हल्ली घडत आहेत, पण चांगले वाईट सगळे माझे आहे! माझ्या मुळे आहे.

हि भावना मला प्रकर्षाने सावरकरांच्या "सागरा प्राण तळमळला" ह्या गाण्याने जाणवली.. युरेका असे झाले तेव्हा कॅलिफोर्निया मध्ये head phone वर हे गाणे ऐकले तेव्हा. लगेच विनय (रानडे) ला फोन केला.. परत येणार हे नक्की असे सांगितले..

एक एक ओळ अशी भिडते बघा.. (http://www.geetmanjusha.com/marathi/lyrics/567.html)


अमेरिकेला जातानाचे मनातले विचार .. अन्य देशी चाल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू"
तिथला गोडवा सुद्धा कंटाळवाणा झाली कि वाटते ... "फुलबाग मला, हाय पारखा झाला.. सागरा प्राण तळमळला"

आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताला डावलले कि असे वाटते..
"मन्मातेला अबल म्हणुनी फसवीसी, मज विवासना ते देती
तरी आंग्लभूमी भयभीता रे, अबला न माझी हि माता रे ..."

काही कारणाने परत येताना उशीर झाला आणि वाटले...
"शुक पंजरी वा हरीण शिरावा पाशी, हि फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती..."

पुढचे कडवे अगदी चपखल..
"नभी नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भारत भूमीचा तारा
प्रासाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिचा जरी वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे...."

पुढे काही सांगायला नकोच!
जय-हिंद!

1 comment:

  1. धन्यवाद मित्रा , वाचून खरच छान वाटलं

    ReplyDelete