Monday, 22 August 2011

Dad, what is corruption?

“Dad, what is corruption?” was asking my ten year old son while I was driving to Jejuri (temple). I told “Beta, people pay extra money to get their things done and they break the rule. See for example, we are standing in queue for parking and someone offers extra money to parking person and he gives our place to that person, is corruption. Both, the one person accept the bribe and the one who pays are doing corruption”.

We reached temple by 5 pm (as we started late) and we wanted come back before its dark. As soon as we reached on top, many pujaris surrounded us if we want to take “direct” darshan and perform special puja. It will be Rs. 50 per person. I thought there is no rush and let’s take darshan by line only. But when we reached to point where line started, it was long line and minimum another 90 minutes will be needed to reach inside.
Before we think next, another person came and he asked for “direct darshan”. I looked as Swapnita and we kind of decided to go for it. Immediately, that man took us to counter where special darshan pass are sold. We got direct entry and we were out in next 15 minutes. Quick! All the people standing in line were kept on hold until we are done and another few who paid for direct entry.

While, I was driving back, I was feeling something wrong. Just few hours ago, I was explaining my son what is corruption. How someone bypasses the rule by paying extra money. I said thank god that my son didn’t ask me why we are paying more. I had no answer to justify that.

Then so many questions came to my mind.. Is it ethical to pay extra money and go ahead in line? May be it is official, but should we have that system in place? Almost all temples in India have two (or more) lines as per you pay. Free, Deluxe, Super Deluxe.. wow!

But, is it happening only in temple? No. We have “free” seat and “paying” seat in colleges. We have “First class” or “business class” in all journeys. Is that fair enough?

Can we stop it? May be the temple (or college) needs the funds to run their system and maintenance? But is that the only way doing it? Can we not have same rules for all?
So many questions and I do have answers.. Am I thinking like communist? Is it bad to be communist?

I would like to post these questions to you now. Can Anna Hazare and Lokpal bill stop this official corruption?

Sanjay Sonar

Thursday, 18 August 2011

सागरा प्राण तळमळला...

येत्या ऑक्टोबर मध्ये मला अमेरिकेतून परत यायला  वर्ष पूर्ण होतील.. 
१५ ऑगस्ट निमित्त मला सांगावेसे वाटते कि मला तिथे कायम स्थायिक होता आले असताना मी परत का आलो ते.
बरेच भारतीय परत येतात ते नाईलाजाने.. आणि जे थोडे फार स्वेच्छेने येतात, ते ४ शिव्या अमेरिकेला, तिथल्या संस्कृती ला देतात.. आणि भारताचे गुणगान करतात. (अर्थात त्यात वाईट काहीच नाही)

मला असे वाटते कि, अमेरिका वाईट नाही. तिथले शिक्षण सुद्धा वाईट नाही.. हवा पाणी, राहणीमान, सुरक्षितता, शांतता, सर्व बाबतीत भारताच्या मानाने अमेरिका सरस आहे, ह्या बद्दल वाद नाही. संस्कुती म्हणाल तर, भारतात शहरांची संस्कुती सुद्धा कालानुरूप बदलत चालली आहे. अगदी भारतीय खेडे गाव सुद्धा बदलले आहे.

मध्यंतरी कोणीतरी मला विचारले कि अमेरिकन संकृती चांगली कि आपली? मुळात दोन्ही देशांना संकृती आहे, हेच किती चांगले आहे. दोन्ही देशांची संकृती भिन्न आहे, पण वाईट कुठलीच नाही. पायी चालणाऱ्या लोकांना आधी प्राधान्य द्यायचे, उगाच होर्न वाजवून त्रास द्यायचा नाही, रांगेची शिस्तअश्या किती तरी गोष्टी आहेत कि ज्या मुळे अमेरिकेचा हेवा वाटतो. तर दुसरीकडे वडील धार्या लोकांचा मान, मुलांसाठी वैयक्तिक गोष्टींचा त्याग, पाहुणचार, विविधता, अश्या अनेक गोष्टी फक्त भारतात आहेत.
थोडक्यात काय, दोन्ही कडे चांगल्या वाईट गोष्टी आहेत.

मग अमेरिका इतकी छान असताना under  developed भारतात परत येण्याचे कारण काय?

कारण असे कि.. मी भारतीय आहे.. कारण असे कि अमेरिका छान आहे, पण तो माझा देश नाही. माझा देश जगात भारी आहे असा माझा दावा नाही.. पण तो माझा आहे. आणि जगासमोर अभिमानाने जावे असाच माझ्या देशाचा इतिहास आहे. लाज वाटावी अश्या काही गोष्टी हल्ली घडत आहेत, पण चांगले वाईट सगळे माझे आहे! माझ्या मुळे आहे.

हि भावना मला प्रकर्षाने सावरकरांच्या "सागरा प्राण तळमळला" ह्या गाण्याने जाणवली.. युरेका असे झाले तेव्हा कॅलिफोर्निया मध्ये head phone वर हे गाणे ऐकले तेव्हा. लगेच विनय (रानडे) ला फोन केला.. परत येणार हे नक्की असे सांगितले..

एक एक ओळ अशी भिडते बघा.. (http://www.geetmanjusha.com/marathi/lyrics/567.html)


अमेरिकेला जातानाचे मनातले विचार .. अन्य देशी चाल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू"
तिथला गोडवा सुद्धा कंटाळवाणा झाली कि वाटते ... "फुलबाग मला, हाय पारखा झाला.. सागरा प्राण तळमळला"

आंतरराष्ट्रीय स्थरावर भारताला डावलले कि असे वाटते..
"मन्मातेला अबल म्हणुनी फसवीसी, मज विवासना ते देती
तरी आंग्लभूमी भयभीता रे, अबला न माझी हि माता रे ..."

काही कारणाने परत येताना उशीर झाला आणि वाटले...
"शुक पंजरी वा हरीण शिरावा पाशी, हि फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती..."

पुढचे कडवे अगदी चपखल..
"नभी नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भारत भूमीचा तारा
प्रासाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिचा जरी वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे...."

पुढे काही सांगायला नकोच!
जय-हिंद!

Monday, 15 August 2011

What can you do for your country?

John F Kennedy said in 1961, ask not what your country can do for you - ask what you can do for your country. Today, our India is completing 64 years of freedom. I just thought that what we all can do for our nation.

There was ad campaign for “Save Tigers”. After looking at the ad, I thought what I can do for saving tigers; but I couldn’t get answer.

Well, if not that what are the things which you and I can do for our country. I listed few things which we can do..

  • Pay your taxes honestly – We all try to see all possible options to get away from paying taxes. Get all benefits which are legal, avoid producing fake bills. Your money will help to build the nation.
  • Ask for bill with VAT number for any purchase from shop
  • Keep our country clean – Its simple thing which we never bother about. If you and I are not cleaning roads, why should we throw chocolate wrapper on road? Just simply carry our garbage with you and put it in dust bin only. Also, let’s not spit on roads. For that matter, why should we spit any where else other than  wash basin?

  • While driving we can do lot many things –
    • Do not blow horn until it is necessary
    • Allow pedestrians first to cross the roads
    • Be kind at lower powerful vehicles like bicycles
    • Allow other vehicles to go first in traffic jam conditions
    • Help people mate in accident, even though many people circle out the place, believe me not even 1% are there to help
    • Switch off engine at signals
  • Do not negotiate with poor service giving sellers like vegetable sellers or cobblers. If the person is making profit or not, you can make it out from his/her outfits. You better will save more money when you try to get discount in big shops.
  • Do not give any cash to beggars. I would prefer to give them job (short time) or food to eat.
  • Reject service offered by child labour like restaurants or workshops
  • Do not take or give bribe for any thing. I experienced that it takes less time when you go by ethical way.
  • Use cotton bag instead of using carry bag for shopping
  • Save water of any kind – Many people in our county don’t get water for drinking also
  • Get your bicycle repaired and use it for short distance travel
  • Be proud as Indian all the time. We got freedom just 64 years ago. We are still developing and we have way to go!!
Sanjay Sonar
Pune

Thursday, 11 August 2011

पु॰लं॰चे एक प्रेरणादायी पत्र

पु॰लं॰च्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये    
पु॰ल॰ आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु॰लं॰नी एका
पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु॰ल॰ सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का   
आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात. या पत्राचं निमित्त ही तसं
वेगळं आहे. पु॰लं॰चे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात - हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या    
मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी
पु॰लं॰ना एक पत्र लिहिलं. त्याचंच हे उत्तर.


१० जुलै १९५७,                                                               
                                                                           
प्रिय चंदू,                                                                  
रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून    
आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र  
तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला   
गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ  
दिवस मी राबतो आहे. आज ९॰३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त  
थकवा उरला आहे. मी विचार केला - फक्त थकवा च उरला आहे का?                       
वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो   
असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल 
तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.         
तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न   
विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस?                 
पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा
आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं
आपण अल्पमतीच.                                                              
पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं 
तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत 
हा प्रश्न सुचतो.                                                             
तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही 
त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे  
पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार
करावा लागतो.                                                              
पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार 
सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते
ते इथेच.                                                                    
तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का -
तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर 
पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण 
झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! 
काय भयंकर अहंकार आहे नाही?                                                   
तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा    
विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा '‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ  
शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया.   
ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.                                              
तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप
गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी
ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही  
जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!                                      
तू सदैव                                                                     
  मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची     
अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं -    
नाटकं लिहायची - विनोदी साहित्य लिहायचं-गायचं - गाणी करायची - कशासाठी? शेवट तर  
ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची      
गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच   
त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला
असल्या निराशेने घेरले आहे.                                                      
तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू - कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? 
भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय   
गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या
प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे.  
शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर    
कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे.  
नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच
ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या  
कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ
काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी 
निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.                           
हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली.    
कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा 
आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे    
. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो  
आहे.                                                                       
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो     
रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे  
कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला       
जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
                                                                           
जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर
हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली  
विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा        
आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते.    
मनाचा आम्ल झडतो.                                                           
तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की - गोर्की - डिकन्स - शेक्सपियर 
वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला  
भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग!  
जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
                                                                           
लग्न जरूर कर, पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते
नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या     
कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि   
चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी  
प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.          
तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू    
म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are  
justifiable?                                                              
माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे                  
  वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी        
हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल      
लिहायला हवं का?                                                            
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू.  
पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.                                      
जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर 
शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख 
कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान  
जीवनाला अर्थ आणतात.                                                        
तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.       
                                                                           
कळावे,                                                                     
                                                                           
भाई.