Monday 28 May 2012

यशासाठी श्रद्धेच्या कुबड्या हव्यात का?


आपण सर्वसाधारण बुद्धीजीवी लोक, कोणत्या बाबा-बुवा  यांच्या मागे न लागता आपले काम निष्ठेने करत असतो. सणासुधी मंदिरात जाणे, पूजा-अर्चा करणे, इथपर्यंत आपली काय ती देवावर श्रद्धा!
मध्यंतरी देउळ सिनेमा पहिला आणि मागे श्रीसत्यसाईबाबा यांचे निधन झाले त्यावेळी आपल्या सचिनला अश्रू ढाळताना पाहिलेतेव्हा कुठेतरी तफावत आहे असे वाटले.
मला तरी आज पर्यंत कधी चमत्कार दिसले नाहीत आणि पुढे तशी इच्छाही नाही. सचिन काय किंवा अमिताभ काय, सर्व जण ज्यांना आपण देव मानतो तेच असे हतबल झालेले पाहिले की वेदना होतात. कुठल्याही देवळात दहा-दहा तास रांगेत उभे राहून दर्शन घेणे मला पटतच नाही. त्यापेक्षा मी घरात देवाची पूजा करून उरलेला वेळ सत्कारणी लावेल. देव सर्वव्यापी आहे मग त्यासाठी तिरुपतीलाच गेले पाहिजे असे काही आहे का?
मग विचार येतो की मी पूर्णपणे नास्तिक आहे का? तर असेही नाही.. मला फक्त पुर्णपणे बुद्धी गहाण टाकून ह्या गोष्टींच्या मागे लागणे आवडत नाही. देवळात दान-पेटीत ५०० रुपये टाकायचे आणि तेच पैसे गैरमार्गाने कमवायचे.

तथापि, कधी अचानक संकट आले की आपसूक देवाचे नाव तोंडावर येते. आणि विशेष म्हणजे त्याने ताण कमी होतो. दुखः कमी होते की नाही हे माहिती नाही, पण दुखः सहन करण्याची शक्ती वाढते हे नक्की. मला वाटते, अध्यात्मिक (आंतरिक) शक्ती प्रत्येकात असते. योग किंवा नामस्मरण याचा प्रत्यय येईल पण तेवढी श्रद्धा मात्र मनापासून पाहिजे. कदाचित सचिनची श्रद्धा तशीच असेल.

Software चा परिणाम hardware वर झाला नाही तरी, Performance वर होतोच! नाही का?

संजय सोनार
२८- मे २०१२

No comments:

Post a Comment